दिल्लीहून विशाखापट्टणम्साठी उड्डाण केलेले इंडिगो कंपनीच्या विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर निघू लागल्याने या विमानाचे पुन्हा दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात यावेळी 170 प्रवासी होते. या घटनेमध्ये कुठलेही नुकसान झाले नसले तरी धूर कशामुळे येत होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. बुधवारी उड्डाण केलेल्या विमानात हा प्रकार घडला होता. या घटनेसाठी इंडिगोकडून इमर्जन्सी घोषित करण्यात आली नव्हती. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून ती घोषित करण्यात आली होती. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर ही इमर्जन्सी मागे घेण्यात आली. त्यानंतर विमानातील प्रवाशांना संध्याकाळी 4.15 वाजता दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews